news
clock
हनुमान जयंतीनिमित्त गुरुवारी सायंकाळी मोशी परिसरात वाहतूकीत बदल

हनुमान जयंतीनिमित्त गुरुवारी सायंकाळी मोशी परिसरात वाहतूकीत बदल

हनुमान जयंतीनिमित्त गुरुवारी सायंकाळी मोशी परिसरात वाहतूकीत बदल 

पिंपरी, ता. १ - श्री हनुमान जयंतीनिमित्त गुरुवारी (ता. २) मोशी गावात मिरवणुकीचे आयोजन केले आहे.  ही मिरवणूक पार पडताना पुणे-नाशिक महामार्गावर वाहतुकीला अडथळा होवु नये, यासाठी मिरवणूक मार्गावरील वाहतुकीत दुपारी चार ते रात्री दहा या वेळेसाठी बदल करण्यात आला आहे. त्याबाबतचे आदेश वाहतूक शाखेने दिले आहेत. 

 पुणे-नाशिक महामार्गाजवळ मोशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात येथे येण्यास वाहनांना मनाई असून, या मार्गावर येणारी वाहने भारतमाता चौक येथून इच्छितस्थळी जातील. वाय पॉइंट कुदळेवस्ती येथून अनुष्का सोसायटी तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक येणारी वाहने भारतमाता चौक येथून जातील.

नागरीकांनी पर्यायी वाहतूक मार्गांचा वापर करावा व वाहतूक विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories