‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानाला’राज्यभरातील बसस्थानकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद

‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानाला’राज्यभरातील बसस्थानकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद

‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानाला’राज्यभरातील बसस्थानकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद 

पुणे, ता. ३० - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) आणि महाराष्ट्र शासन परिवहन विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या वर्षभर राबविण्यात आलेल्या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानाला’राज्यभरातील बसस्थानकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या अभियानामुळे स्वच्छता, सुशोभीकरण, प्रवासी सुविधा आणि व्यवस्थापनामध्ये उल्लेखनीय सुधारणा झाल्याचे दिसून आले आहे.

सन २०२५-२६ च्या सर्वेक्षणानुसार राज्यातील ‘अ’ वर्गात पुणे विभागातील बारामती बसस्थानकाने ९७ गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. ‘ब’ वर्गात भंडारा विभागातील लाखणी बसस्थानकाने ९७ गुण मिळवत अव्वल स्थान मिळविले, तर ‘क’ वर्गात अहिल्यानगर विभागातील अकोले बसस्थानकाने ९८ गुणांसह राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला.

प्रादेशिक विभागनिहाय निकालात छत्रपती संभाजीनगर विभागातील औरसा नवीन, मुंबई विभागातील रत्नागिरी, नागपूर विभागातील चंद्रपूर, पुणे विभागातील बारामती, नाशिक विभागातील सटाणा आणि अमरावती विभागातील उमरखेड या बसस्थानकांनी आपल्या-आपल्या विभागात प्रथम क्रमांक मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबवण्यात आले. 




 

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories