news
clock
नवीन कात्रज बोगद्याजवळ भरधाव कंटेनरची ३-४ वाहनांना धडक, ७-८ जखमी

नवीन कात्रज बोगद्याजवळ भरधाव कंटेनरची ३-४ वाहनांना धडक, ७-८ जखमी

नवीन कात्रज बोगद्याजवळ भरधाव कंटेनरची ३-४ वाहनांना धडक, ७-८ जखमी

पुणे, ता. ५ - नवीन कात्रज बोगद्याजवळील जांभुळवाडी दरी पूल परिसरात गुरुवारी (ता. ५) दुपारी एक भीषण साखळी अपघात झाला आहे. कंटेनर चालक भरधाव कंटेनर चालवत होता. त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कंटेनरने समोर असलेल्या तीन ते चार वाहनांना जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. या घटनेत सात-आठ जण जखमी झाले आहेत. 

साताऱ्याकडूनन दिशेकडून पुण्याकडे येणारा कंटेनर अचानक नियंत्रणाबाहेर गेला आणि त्याने पुढे असलेल्या चारचाकी वाहनांना पाठीमागून जोरात धडक दिली. या धडकेत चार कारचे मोठे नुकसान झाले. काही वाहनांच्या काचा फुटल्या, गाड्यांचे सुटे भाग रस्त्यावर विखुरले गेले. अपघातानंतर स्थानिक नागरिक, इतर वाहनचालक आणि प्रवाशांनी तात्काळ मदतकार्य सुरु केले. जखमींना बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिस, अग्निशमन दल आणि आपत्कालीन सेवा घटनास्थळी दाखल झाल्या. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर आहे, असे समजते.

या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती. वाहनांची मोठी कोंडी लागली. पोलिस आणि वाहतूक पथकाने घटनास्थळावरील वाहने बाजूला करून वाहतूक हळूहळू सुरळीत केली. 

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories