news
clock
पिंपळे सौदागर गावठाणात होणार नवीन 'पोस्ट ऑफीस', नगरसेवक नाना काटे यांचा पाठपुरावा

पिंपळे सौदागर गावठाणात होणार नवीन 'पोस्ट ऑफीस', नगरसेवक नाना काटे यांचा पाठपुरावा

पिंपळे सौदागर गावठाणात होणार नवीन 'पोस्ट ऑफीस', नगरसेवक नाना काटे यांचा पाठपुरावा 

पिंपरी, ता. ९ - रहाटणी-पिंपळे सौदागर प्रभागातील नागरीकांना पोस्ट ऑफिससंबंधित कामासाठी येथील नागरिकांना चिंचवड किंवा औंध, पुणे येथे जावे लागत होते. ही गैरसोय लक्षात घेऊन माजी विरोधी पक्षनेते व विद्यमान नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी पोस्ट ऑफिस सुरु करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. आता पिंपळे सौदागर गावठाण येथील हनुमान मंदिरावरील हॉल पोस्ट ऑफिससाठी देण्यास महापालिकेने मान्यता दिली.

नाना काटे यांच्या प्रयत्नांमुळे शिवार चौक येथे २०१० साली टपाल पेटी बसविण्यात आली तसेच दर सोमवारी कुणाल आयकॉन रोड येथे पोस्ट ऑफिसची फिरती गाडी उपलब्ध करुन देण्यात आली. परंतु देखील जेष्ठ नागरिक किवां महिला यांना अनेक समस्याला सामोरे जावे लागत होते ही बाब विचारात घेता, पिंपळे सौदागर परिसरातील नागरिकांची वाढती मागणी लक्षात घेऊन नाना काटे यांनी पोस्ट ऑफिस सुरु करण्यासाठी वेळोवेळी पत्रव्यवहार व पाठपुरावा सुरूच ठेवला. त्यांनी परिसरातील विविध खासगी व सरकारी जागा तसेच गाळे सुचवून तेथे पोस्ट ऑफिस सुरू करण्याबाबत विनंतीपत्रे दिली व प्रत्यक्ष भेटूनही सूचना केल्या.

या संदर्भात त्यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचीही भेट घेऊन मदत मागितली. अजितदादा पवार यांनी देखील याची दखल घेत प्रशासन स्तरावर पाठपुरावा करुन आवश्यक सहकार्य केले. काटे यांनी सन २०१७ पासून सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे दिल्ली व पुणे येथील पोस्ट ऑफिस प्रशासनाने पिंपळे सौदागर येथे पोस्ट ऑफिस सुरु करण्यास सहमती दर्शविली. त्यानुसार सन २०२३ पासून पोस्ट ऑफिससाठी आवश्यक कागदपत्रे व जागेची माहिती नाना काटे व पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाच्या वतीने पोस्ट ऑफिस विभागाला देण्यात आली. त्यानुसार पिंपळे सौदागर गावठाण येथील हनुमान मंदिरावरील हॉल पोस्ट ऑफिससाठी देण्यास महापालिकेने मान्यता दिली.

पोस्ट ऑफिस हे सामान्य नागरिकांच्या सोयीसाठी असल्यामुळे त्याचे वार्षिक भाडे कमी असावे तसेच मिळकत करात सवलत देण्यात यावी, अशी विनंती अजित पवार यांच्याकडे केली होती. त्यांच्या सूचनेनुसार महापालिकेने सकारात्मक प्रतिसाद देत भारतीय पोस्ट विभागाच्या धोरणानुसार वार्षिक भाडे निश्चित केले. या पाठपुराव्याचे पुढील पाऊल म्हणून पिंपळे सौदागर येथील मंजूर पोस्ट ऑफिससाठी नवीन पिन कोड ४११०८३ देखील मंजूर करण्यात आला. काही दिवसांतच अजितदादांच्या हस्ते या पोस्ट ऑफिसचे उद्घाटन करण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र त्यांच्या निधनामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला. आता लवकरच या पोस्ट ऑफिसचे उद्घाटन करण्यात येणार आहे अशी माहिती नाना काटे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories