निगडीतील पवळे उड्डाणपुलाखालील 'पीएमपी'चा बसथांबा भक्ती-शक्ती उद्योनासमोर हलवण्याची मागणी
निगडीतील पवळे उड्डाणपुलाखालील 'पीएमपी'चा बसथांबा भक्ती-शक्ती उद्योनासमोर हलवण्याची मागणी
पिंपरी, ता. २१ जुलै २०२६ - निगडी ते पिंपरी मेट्रो रेल्वे काम सुरु असून निगडीतील मधुकर पवळे उड्डाणपूलाखाली सिग्नल यंत्रणा कुचकामी ठरत असून त्या ठिकाणी वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होतोय. हा प्रश्न सोडवण्यासाठी येथील पीएमपीएमएल बस स्टॉप भक्ती-शक्ती उद्यानासमोर हलविण्यात यावा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी प्रशासनाकडे केली आहे.
काळभोर यांनी म्हटले आहे की, निगडी बस स्टॉप ह्या ठिकाणी निगडी ते पिंपरी मेट्रो रेल्वे काम सुरू असून त्या ठिकाणी लोखंडी पत्रे मुंबई पुणे महामार्गावर रस्त्यावर लावण्यात आले असून त्या मुळे मुंबई पुणे महामार्गावर रस्ता अरुंद झाला आहे. ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या बस, पीएमपीएमएल बस तसेच मोठ्या गाड्या मुळे वाहतूक कोंडी समस्या मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली असून पीएमपीएमएल बस स्टॉप निगडी भक्ती शक्ती उद्यान समोर हलविण्यात यावा जेणेकरून वाहतूक कोंडी समस्या कमी होईल. तसेच नागरिकांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडता येईल.
या संदर्भात पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, मेट्रो रेल्वे प्रकल्प अधिकारी श्रावण हर्डीकर तसेच वाहतूक पोलिस उपायुक्त देशमुख ह्यांनी ताबडतोब येथे पाहणी करून कार्यवाही करावी. प्रशासनाच्या विविध विभागांना ईमेलद्वारे तक्रार केली असल्याचे काळभोर यांनी सांगितले आहे.
- सचिन काळभोर, Sachin Kalbhor, भारतीय जनता पक्ष, Bharatiya Janata Party, BJP
- बसथांबा स्थलांतर, Bus Stop Relocation
- मुंबई-पुणे महामार्ग, Mumbai-Pune Highway
- बसथांबा, Bus Stop, भक्ती-शक्ती उद्यान, Bhakti Shakti Garden, Bhakti Shakti Park
- पीएमपीएमएल, PMPML, PMPML Bus Stop
- निगडी, Nigdi, मधुकर पवळे उड्डाणपूल, Madhukar Pawale Flyover