शाळा सांगेल तिथूनच शालेय साहित्य घेण्याची सक्ती पालकांवर करता येणार नाही, शिक्षण विभागाच्या शाळांना सूचना

शाळा सांगेल तिथूनच शालेय साहित्य घेण्याची सक्ती पालकांवर करता येणार नाही, शिक्षण विभागाच्या शाळांना सूचना

शाळा सांगेल तिथूनच शालेय साहित्य घेण्याची सक्ती पालकांवर करता येणार नाही, शिक्षण विभागाच्या शाळांना सूचना  

पुणे, ता. १७ - राज्यातील सर्व माध्यमांच्या खासगी प्राथमिक आणि माध्यमिक शाळांनी गणवेश, वह्या, पुस्तके आणि इतर शैक्षणिक साहित्य ठराविक दुकानांतून किंवा शाळेतून खरेदी करण्याची सक्ती पालकांवर करु नये, असा आदेश प्राथमिक आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने दिला आहे. याबाबत सर्व शाळांना सूचना देण्यात येत आहेत.  

 प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी परिपत्रकाद्वारे हे आदेश दिले आहेत. या आदेशात स्पष्ट केले आहे की, खासगी शाळांनी गणवेश व शैक्षणिक साहित्य शाळेतून किंवा शाळेने ठरवून दिलेल्या दुकानांतून घेण्याची सक्ती पालकांवर करु नये. याबाबत

तक्रारी प्राप्त झाल्यास अधिकाऱ्यांनी शहानिशा करुन तथ्य आढळल्यास शाळेवर कारवाई केली जाणार आहे. शाळांनी राज्य माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळ, सीबीएसई, आयसीएसई मंडळाच्या शाळांनी राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी) आणि बालभारतीची पाठ्यपुस्तके वापरावीत. इतर मंडळांच्या शाळांनी त्या-त्या मंडळांनी प्रमाणित केलेली पाठ्यपुस्तके वापरावीत. विशिष्ट खासगी प्रकाशनांच्या पुस्तकांचा वापर करण्याचे बंधन, सक्ती विद्यार्थ्यांवर करु नये.

 विद्यार्थ्यांना गणवेश, इतर शैक्षणिक साहित्य विशिष्ट दुकानातून किंवा शाळेतूनच खरेदी करण्याची सक्ती करणार नाही, असा ठराव खासगी शाळांमधील शाळा व्यवस्थापन समितीमध्ये केला जावा तसेच याबाबतच्या तक्रारींसाठी अधिकाऱ्यांची नेमणूक करुन,  ई-मेल आयडी तयार करुन प्रसिद्ध करावा, असे शिक्षण विभागाने सांगितले आहे. 



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories