पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाबाबत पवना बंदिस्त जलवाहिनी विरोधी कृती समितीची महापौरांशी चर्चा
पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाबाबत पवना बंदिस्त जलवाहिनी विरोधी कृती समितीची महापौरांशी चर्चा
पिंपरी, दि. ३ जुलै २०२६ - पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाच्या अनुषंगाने आज, शुक्रवारी (ता. ३) पवना धरणग्रस्त संघटना, जमीन हक्क परिषद आणि पवना बंदिस्त जलवाहिनी विरोधी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांशी महापौर रवी लांडगे यांनी सविस्तर चर्चा केली.
यावेळी प्रकल्पासंदर्भातील विविध हरकती, सूचना, शंका व मागण्या संघटनांच्या प्रतिनिधींनी मांडल्या. सर्व मुद्द्यांची नोंद करण्यात आली. पिंपरी-चिंचवड शहराच्या भविष्यातील पाणीसुरक्षा सुनिश्चित करताना धरणग्रस्त व स्थानिक नागरिकांच्या न्याय्य हक्कांचे संरक्षण होणे तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे विकास आणि लोकहित यामध्ये समतोल राखत सर्व संबंधितांच्या सहभागातून सकारात्मक व सर्वमान्य तोडगा काढण्यासाठी मांडलेले मुद्दे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून देणार आहोत, असे महापौरांनी सांगितले.
यावेळी पवना बंदिस्त जलवाहिनी विरोधी कृती समितीचे सदस्य विश्वनाथ शेलार (अध्यक्ष, मावळ तालुका भारतीय किसान संघ), यशवंत बोडके (गहुंजे ग्रामस्थ व किसान संघ सदस्य), माऊली दळवी (माजी सभापती, पंचायत समिती मावळ), सुभाष धामणकर (तालुका अध्यक्ष, भारतीय किसान मोर्चा, मावळ), माऊली सोनवणे (अध्यक्ष, जमीन हक्क परिषद), राजू आगळे (माजी पंचायत समिती सदस्य, मावळ), नारायण बोडके (अध्यक्ष, पवना धरणग्रस्त संयुक्त समिती), अनंता महिपती खैरे (तिकोना धरणग्रस्त शेतकरी), बाळासाहेब काळे (सचिव, धरणग्रस्त संघटना, मावळ), अनंता वरवे (माजी सरपंच व गणाध्यक्ष, भाजप), ह.भ.प. शंकर महाराज आडकर (शिवली, मावळ) तसेच ह.भ.प. अनंता लायगुडे (आजीवली, मावळ) उपस्थित होते.
- जमीन हक्क परिषद, Land Rights Council, पवना धरणग्रस्त संघटना, Pavana Dam Affected Association, मावळ, Maval, मावळ तालुका, Maval Taluka,
- पवना धरण, Pavana Dam, पवना धरणग्रस्त, Pavana Dam Affected, धरणग्रस्त शेतकरी, Dam Affected Farmers
- पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प, Pavana Closed Water Pipeline Project, पवना जलवाहिनी, Pavana Water Pipeline