१६ जुलैअखेर पवना धरणातील पाणीसाठा ७६.४८ टक्के

१६ जुलैअखेर पवना धरणातील पाणीसाठा  ७६.४८ टक्के

 १६ जुलैअखेर पवना धरणातील पाणीसाठा  ७६.४८ टक्के

पिंपरी, ता. १७ जुलै २०२६ - पिंपरी-चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणात गुरुवार, १६ जुलै अखेर एकूण जलसाठा ७६.४८ टक्के झाला आहे. यात  उपयुक्त पाणीसाठा ७५.९७ टक्के आहे. शहरवासियांसाठी ही समाधानाची बाब आहे. 

यंदा मान्सूनला विलंब झाल्याने बहुतांश धरणांनी तळ गाठले होते. जूनमध्ये पवना धरणात १८ टक्के पाणीसाठा होता. त्यामुळे त्यामुळे जलसंपदा विभागाच्या सुचनेनुसार महापालिकेने १९ जूनपासून पाणी कपात लागू केली. त्यामुळे पाणी पुरवठ्याच्या तक्रारी वाढतच होत्या.  जुलै महिन्याच्या सुरुवातीला शहरात दमदार पाऊस पडला.  पवना

धरणातील पाणीसाठ्यात ४ जुलैपर्यंत २७.६२ टक्के पाणीसाठा झाला होता. ५ आणि ६ जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणात ५० टक्के पाणीसाठा झाला. आता १६ जुलैअखेर पवना धरणातील पाणीसाठा ७६.४८ टक्के  झाला आहे. 

मात्र, पुढेही एल निनोच्या प्रभावामुळे  पाऊस कमी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाने महापालिकेला पत्र पाठवून सुरू असलेली पाणी कपात कायम ठेवावी, अशी सूचना केली आहे. 










Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories