महापालिका 'ब' क्षेत्रिय कार्यालयातील सफाई कर्मचाऱ्यावर तीन अपत्ये असल्याने कारवाई
पिंपरी, ता. २९ - महाराष्ट्र शासनाच्या नियमांनुसार, २८ मार्च २००५ नंतर तिसरे अपत्य असलेल्या उमेदवारांना शासकीय नोकरीसाठी अपात्र ठरवले जाते. मात्र, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 'ब' क्षेत्रीय कार्यालयातील आरोग्य विभागातील सफाई कर्मचारी रामचंद्र ज्ञानोबा शेलार यांना तीन अपत्ये असल्याचे निर्दशनास आले आहे. त्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी विभागीय चौकशी सुरू करण्याचे आदेश दिले.
शेलार यांना तीन मुले असल्याची तक्रारी प्राप्त झाल्यानंतर त्यांना नोटीस बजावण्यात आली होती. खुलाशात त्यांनी तीन मुले असल्याचे अमान्य केले आहे. मात्र, तक्रारदारांनी सादर केलेल्या कागदपत्रांनुसार त्यांना तीन अपत्ये असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी त्यांच्यावर कारवाई केली आहे. शेलार यांची विभागीय चौकशी सुरु करण्यात आली आहे.
- Public Service Rules, Employee Investigation, False Declaration Case
- Disciplinary Action, Service Rule Violation, Government Employee Action
- Vijay Suryavanshi, Municipal Commissioner, आरोग्य विभाग, Health Department PCMC, B Regional Office PCMC,
- तीन अपत्य नियम, Third Child Rule, महाराष्ट्र शासन नियम 2005,
- पिंपरी चिंचवड महानगरपालिका, PCMC, सफाई कर्मचारी, रामचंद्र शेलार, Ramchandra Shelar