महापालिकेत झळकणार दिवंगत अहिल्यादेवी होळकर, अजितदादा, लक्ष्मणभाऊ यांची तैलचित्रे
- स्थायी समितीच्या मंजुरीनंतर प्रत्यक्ष कामाला होणार सुरुवात
पिंपरी, ता. १५ जुलै २०२६ - पिंपरी-चिंचवड महापालिका भवनात राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार, माजी आमदार दिवंगत लक्ष्मणभाऊ जगताप तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची तैलचित्रे मुख्य प्रशासकीय इमारतीच्या दर्शनी भागात लावली जाणार आहेत.
तैलचित्रे लावण्याचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव गुरुवारी (ता. 16) होणाऱ्या स्थायी समितीच्या सभेपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. स्थायी समितीच्या मंजुरीनंतर ही तैलचित्रे महापालिकेच्या मुख्यालयात व सभागृहात पाहायला मिळतील.
यापूर्वी महापालिका सभेमध्ये दिवगंत उपमुख्यमंत्री अजित पवार व लक्ष्मण जगताप यांची तैलचित्रे लावण्यास मान्यता दिली होती. त्यानंतर महापौरांकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे तैलचित्र सभागृहात लावण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार तिन्ही तैलचित्रे बसविण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे.
प्रस्तावानुसार, चित्रकार सुनील शेगावकर यांच्याकडून ही तैलचित्रे तयार करण्यात येणार आहेत. अजितदादा पवार व लक्ष्मणभाऊ जगताप यांची प्रत्येकी ८ बाय ५ फूट, तर अहिल्यादेवी होळकर यांचे ६ फूट ६ इंच बाय ४ फूट आकाराचे तैलचित्र तयार करण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक खर्च महापालिकेच्या अंदाजपत्रकातील विशेष योजनेतून करण्यात येणार आहे. महापालिकेच्या मुख्यालयात शहराच्या विकासात मोलाचे योगदान देणाऱ्या नेत्यांची स्मृती जपली जावी आणि भावी पिढीला त्यांच्या कार्याची प्रेरणा मिळावी, या उद्देशाने ही तैलचित्रे लावली जाणार आहेत.
- महापालिका सभागृह, Municipal Hall, मुख्य प्रशासकीय इमारत, Main Administrative Building
- दिवंगत अजितदादा पवार, Late Ajitdada Pawar, अजित पवार, Ajit Pawar, लक्ष्मणभाऊ जगताप, Laxmanbhau Jagtap, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, Punyashlok Ahilyadevi Holkar
- PCMC, महापालिका भवन, Municipal Corporation Building, तैलचित्रे, Portrait Paintings