वाहतूक पोलिसांकडून शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना रस्ते सुरक्षा, सायबर गुन्हेगारी, अंमली पदार्थ, व्यसनाधीनता या विषयांवर मार्गदर्शन
वाहतूक पोलिसांकडून शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना रस्ते सुरक्षा, सायबर गुन्हेगारी, अंमली पदार्थ, व्यसनाधीनता या विषयांवर मार्गदर्शन
पिंपरी, ता. ३ जुलै २०२६ - पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांकडून गुरुवारी (ता. २) शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना रस्ते सुरक्षा, सायबर गुन्हेगारी, सोशल मिडीयाचा वापर, अंमली पदार्थ, व्यसनाधीनता या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत वाहतूक शाखेच्या एकूण १४ गटांच्या माध्यमातुन १४ शाळांमध्ये जाऊन मार्गदर्शन करण्यात आले.
पिंपरी-चिंचवड कार्यक्षेत्रातील वाहतूक शाखेच्या विभागामध्ये दर महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या गुरूवारी 'एकदिवस शाळेसाठी' हा उपक्रम राबविण्यात येतो.
या उपक्रमाअंतर्गत आतापर्यत एकूण ३० टप्प्यांमध्ये ४८८ शाळांमध्ये जाऊन १ लाख ११ हजार ३३६ विद्यार्थाना मार्गदर्शन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी जबाबदार नागरिक व चांगला माणूस बनावे या दृष्टीकोनातून पिंपरी-चिंचवड वाहतूक विभागामार्फत या प्रबोधनपर उपक्रमाचे यशस्वी नियोजन करण्यात आले आहे.
२ जुलैला या उपक्रमाचा ३० वा टप्पा पार पडला. यामध्ये एकूण १४ गटांच्या माध्यमातून, निवडलेल्या १४ शाळांमधून सुमारे १ हजार ७३० विद्यार्थ्यांपर्यंत पोहचून त्यांना पीपीटीद्वारे मुद्देसूद मार्गदर्शन करण्यात आले.
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलिस सह आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलिस आयुक्त सारंग आवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख तसेच वाहतूक शाखेचे सर्व पोलिस अधिकारी व अंमलदार यांच्याद्वारे हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला. या विद्यार्थीभिमुख उपक्रमाचा पुढील टप्पा गुरुवारी (ता. १६) रोजी आयोजित करण्यात येणार आहे.
- Social Media Awareness, Drug Abuse, Addiction Awareness, Student Awareness, Traffic Rules, Road Safety Awarenes
- One Day for School
- School Students, College Students guidence
- Pimpri Chinchwad, Road Safety, Traffic Police
- शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी मार्गदर्शन
- पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिस
- रस्ते सुरक्षा, वाहतूक पोलिस