पीएचडी करणाऱ्या विद्यार्थिनीची प्राध्यापकाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या, शाहूनगर-चिंचवडमधील घटना
Apr 13 2026
32
पीएचडी करणाऱ्या विद्यार्थिनीची प्राध्यापकाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या,शाहूनगर-चिंचवडमधील घटना
पुणे, ता. १३ - पीएचडीच्या गाइडकडून झालेल्या छळाला वैतागून पीएचडी करणाऱ्या एका ३० वर्षीय विद्यार्थिनीने शनिवारी (ता. ११) शाहूनगर-चिंचवड येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तिचा छळ करणाऱ्या प्राध्यापक डॉ. ए. बिन्नियमिन ( वय ५०, रा. धानोरी ) याला पोलिसांनी अटक केली आहे.
मृत विद्यार्थिनीच्या वडिलांनी या प्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे. पुण्यातील बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडिया संस्थेत बॉटनी या विषयात पीएचडी करत होती. आरोपी बिन्नियमिन तिचा गाइड होता. आत्महत्या करण्यापूर्वी विद्यार्थिनीने चिठ्ठी लिहून ठेवली आहे, त्यात ऑगस्ट २०२५ पासून बिन्नियमिन हा अनैतिक प्रकार, गैरवर्तन करत होता आणि मानसिक त्रास देत होता. त्याच्या या त्रासाला कंटाळून तरुणीने आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी दोन दिवस आधी बिन्नियमिन याने स्टॅम्प पेपरवर पुन्हा असा प्रकार करणार नाही. चूक झाली, असे लिहून दिले होते. पण, संबंधित तरुणीला हे सहन झाले नाही. त्यामुळे, तिने चिठ्ठी लिहून राहत्या घरी गळफास घेतला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी बिन्नियमिन याला अटक केली असून, त्याला बुधवारपर्यंत ( १५ एप्रिल ) पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. पोलिस निरीक्षक भोजराज मिसाळ तपास करीत आहेत.
- मार्गदर्शकाचा त्रास, guide harassment, मानसिक छळ, mental harassment,
- पोलिस कारवाई, police action, अटक प्रकरण, arrest case
- बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडिया, Botanical Survey of India,
- शाहूनगर चिंचवड, Shahunagar Chinchwad,
- प्राध्यापक छळ, professor harassment,
- पीएचडी विद्यार्थिनी आत्महत्या, PhD student suicide