महानगरपालिका हद्दीतील १३ गावे पिंपरी-चिंचवड नगर भूमापन कार्यालयाशी संलग्न करण्यास शासनाची मान्यता

महानगरपालिका हद्दीतील १३ गावे पिंपरी-चिंचवड नगर भूमापन कार्यालयाशी संलग्न करण्यास शासनाची मान्यता

 महानगरपालिका हद्दीतील १३ गावे पिंपरी-चिंचवड नगर भूमापन कार्यालयाशी संलग्न करण्यास शासनाची मान्यता

पिंपरी, ता. २० - पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील बोपखेल, दिघी, वडमुखवाडी, चऱ्होली, चोवीसावाडी, डुडुळगाव, मोशी, चिखली, देहू, किन्हई, रावेत, मामुर्डी, किवळे या गावांना  पिंपरी-चिंचवड नगर भूमापन कार्यालयाशी संलग्न करण्यास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी  मान्यता दिली आहे, अशी माहिती आमदार महेश लांडगे यांनी दिली आहे व बावनकुळे यांचे आभारही मानले आहेत.

 पूर्वी ही गावे हवेली ग्रामीण भूमि अभिलेख कार्यालयाशी जोडली असल्यामुळे अनेक नागरिकांना पायपीट करावी लागत होती. ही गावे पिंपरी-चिंचवड नगर भूमापन कार्यालयाशी जोडण्याची मागणी  मार्च २०२५ मध्ये आमदार लांडगे यांनी महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. त्यानंतर पाठपुरावा केला होता.

आता, बोपखेल, दिघी, वडमुखवाडी, चऱ्होली, चोवीसावाडी, डुडुळगाव, मोशी, चिखली, देहू, किन्हई, रावेत, मामुर्डी, किवळे ही गावे नव्याने निर्माण होणाऱ्या नगर भूमापन कार्यालयास ही गावे जोडली जाणार आहेत. त्यामुळे, जमिन मोजणी, प्रापर्टी कार्ड व इतर अभिलेख कामांसाठी या सुविधा नागरीकांना पिंपरी-चिंचवडमध्येच उपलब्ध होणार आहेत. 

याबाबतचा आदेश लवकरच पारीत होईल. या निर्णयामुळे नागरिकांना जमीन मोजणी, प्रॉपर्टी कार्ड व इतर अभिलेख कामांसाठी होणारी पायपीट थांबणार असून वेळ व खर्चाची मोठी बचत होणार आहे. सर्व सरकारी सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे, असे आमदार जगताप यांनी सांगितले.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories