news
clock
पिंपरी-चिंचवड शहर भाजयुमोच्या वतीने ‘मातृदिन’ उत्साहात साजरा

पिंपरी-चिंचवड शहर भाजयुमोच्या वतीने ‘मातृदिन’ उत्साहात साजरा

पिंपरी-चिंचवड शहर भाजयुमोच्या वतीने ‘मातृदिन’ उत्साहात साजरा

पिंपरी, ता. १२ - अनेक मातांचा सन्मान करुन पिंपरी चिंचवड शहरा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने ‘मातृदिन’ साजरा करण्यात आला.  प्रत्येक मातेचा त्याग,  प्रेम आणि संस्कारांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. अनेक तरुणांनी आपल्या आईसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करुन मातृप्रेम व्यक्त केले. भोसरी, चिंचवड आणि पिंपरी परिसरात आयोजित कार्यक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

यावेळी भाजयुमो पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष दिनेश यादव यांनी सांगितले की, “आई ही केवळ व्यक्ती नसून ती संस्कारांची शाळा आहे. समाजाला योग्य दिशा देणारी आणि नवीन पिढी घडवणारी सर्वात मोठी शक्ती म्हणजे आई. आजच्या धावपळीच्या जीवनात आईप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हे प्रत्येक तरुणाचे कर्तव्य आहे.”

कार्यक्रमादरम्यान अनेक युवकांनी आपल्या आईबद्दलच्या भावना व्यक्त करत मातांच्या चरणी कृतज्ञता अर्पण केली. या उपक्रमामुळे समाजामध्ये मातृशक्तीबद्दल आदर आणि आपुलकीची भावना अधिक दृढ झाली.

या कार्यक्रमात भाजप व भाजयुमोचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाजयुमोच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories