पिंपरीत भरधाव दुचाकीची महिलेला धडक; अज्ञात चालकावर गुन्हा

पिंपरीत भरधाव दुचाकीची महिलेला धडक; अज्ञात चालकावर गुन्हा

पिंपरी | १७ ऑक्टोबर २०२६ : पिंपरी-चिंचवडमधील मोरवाडी परिसरात पायी जाणाऱ्या एका महिलेला भरधाव दुचाकीने अचानक धडक दिल्याची घटना समोर आली आहे. या अपघातानंतर संबंधित दुचाकीचालकाने जखमी महिलेला उपचारासाठी न नेता घटनास्थळावरून निघून गेल्याचा आरोप आहे. या प्रकरणी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास पिंपरीतील मोरवाडी परिसरात घडली.

या प्रकरणी एका महिलेने फिर्याद दिली आहे. घटनेच्या वेळी फिर्यादी आणि त्यांच्या शेजारी राहणाऱ्या मैत्रीण दोघी एसएनबीपी शाळेकडून म्हाडा कॉलनीकडे पायी जात होत्या.

त्यावेळी एका अज्ञात दुचाकीचालकाने बेदरकारपणे आणि भरधाव वेगाने वाहन चालवत वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून फिर्यादीला अचानक धडक दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या धडकेत फिर्यादी महिला जखमी झाली. मात्र, अपघातानंतर संबंधित चालकाने जखमी महिलेला उपचारासाठी नेले नाही, असा आरोप फिर्यादीने केला आहे.

या प्रकरणी अज्ञात टू-व्हीलर चालकाविरोधात संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५४४/२०२६ दाखल करण्यात आला आहे.

भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम २८१ आणि १२५(ब) तसेच मोटार वाहन कायद्यातील कलम १८४, १३४, १७७ आणि ११९/१७७ नुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास संत तुकारामनगर पोलीस करत आहेत.

 

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories