मोशी डेपो तत्काळ बंद करुन पुनावळे कचरा डेपो सुरू करा, माहिती अधिकार कार्यकर्ते रमेश वाघेरे यांची मागणी

पिंपरी, ता. ११ जुलै २०२६ - मोशी कचरा डेपो तत्काळ बंद करून पुनावळे कचरा डेपो कार्यान्वित करण्याची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते रमेश नानासाहेब वाघेरे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे केली आहे.

याबाबत, त्यांनी निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, १९८२ पासून सुरू असलेल्या मोशी कचरा डेपोची क्षमता अनेक वर्षांपूर्वीच संपली असून, त्यानंतरही डेपो सुरू ठेवल्यामुळेच ही दुर्घटना घडली. कामगारांना जीव गमवावा लागला. पुनावळे कचरा डेपोचे आरक्षण १९९७ पासून अस्तित्वात असून, त्यासाठी शासनाकडे निधीही जमा करण्यात आला होता. मात्र राजकीय विरोध आणि इतर कारणांमुळे तो प्रकल्प रखडला. 

 पुनावळे कचरा डेपोला विरोध करणारे लोकप्रतिनिधी, तसेच भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्यावरही गंभीर आरोप करुन मोशी दुर्घटनेसाठी त्यांचीही जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी वाघेरे यांनी केली आहे. पुनावळे डेपोला विरोध करणाऱ्यांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, असे वाघेरे यांनी म्हटले आहे. 

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories