रयत विद्यार्थी विचार मंचाची नवी कार्यकारिणी; विक्रांत शेळके प्रभारी प्रदेशाध्यक्ष
पिंपरी-चिंचवड : शिक्षण, साहित्य, रोजगार, आरोग्य, कला, क्रीडा आणि महिला सक्षमीकरण या क्षेत्रांत गेल्या ११ वर्षांपासून कार्यरत असलेल्या रयत विद्यार्थी विचार मंच, महाराष्ट्र राज्य या संघटनेची कार्यकारिणी नव्याने गठित करण्यात आली आहे. संस्थापक अध्यक्ष ॲड. धम्मराज साळवे आणि प्रदेश महासचिव संतोष सुभाष शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पदाधिकाऱ्यांवर संघटनात्मक जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत.
नवीन कार्यकारिणीत प्रा. विक्रांत शेळके यांची प्रभारी प्रदेशाध्यक्ष तथा प्रवक्ता, मयूर जगताप यांची प्रदेश उपाध्यक्ष, तर संतोष सुभाष शिंदे यांची प्रदेश महासचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
तसेच अतुल वाघमारे यांच्याकडे प्रदेश संपर्क प्रमुख, प्रगती कोपरे आणि यशवंत सोनकांबळे यांच्याकडे प्रदेश सचिव, अभिषेक चक्रनारायण यांच्याकडे प्रदेश संघटक आणि स्वराज कांबळे यांच्याकडे प्रदेश सहसंघटकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
विभागीय आणि जिल्हास्तरावरील नियुक्त्यांमध्ये सौरभ जंजाळ यांची उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष, ॲड. सागर गायकवाड यांची रयत पालक संघाच्या प्रदेशाध्यक्षपदी, तर अमित साटम यांची पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
स्थानिक पातळीवर योगेश कांबळे यांची पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष, अजय यादव यांची पुणे जिल्हाध्यक्ष, सागर रोहिदास गायकवाड यांची पुणे जिल्हा संघटक, तर रोहन कांबळे यांची कोल्हापूर जिल्हा संघटक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रदेश सदस्य म्हणून महेश गायकवाड, रोहित कांबळे, नीरज भालेराव, सनी पिसाळ, सुनीता गरुड, श्रुतिका गाडे, समाधान गायकवाड आणि शमशोद्दीन गाझी शेख यांची निवड करण्यात आली आहे.
रयत विद्यार्थी विचार मंच गेल्या ११ वर्षांपासून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रश्न, युवकांचे रोजगारविषयक प्रश्न, सामाजिक न्याय, आरोग्य, साहित्य, क्रीडा आणि महिला सक्षमीकरण या विषयांवर काम करत आहे. नव्या कार्यकारिणीच्या माध्यमातून राज्यभर संघटनेचा विस्तार करण्याबरोबरच विद्यार्थी आणि वंचित घटकांच्या प्रश्नांसाठी अधिक प्रभावीपणे काम करण्याचा संस्थेचा मानस आहे.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करताना प्रभारी प्रदेशाध्यक्ष प्रा. विक्रांत शेळके यांनी “सोबत आहोत, सोबत राहू आणि संघटनात्मक कार्य अधिक बळकट करू,” असा संदेश दिला.