news
clock
रेस्टॉरंट चालकांनी पाइपलाइनद्वारे गॅस असेल तर त्वरित त्याचा जोड घ्यावा - जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

रेस्टॉरंट चालकांनी पाइपलाइनद्वारे गॅस असेल तर त्वरित त्याचा जोड घ्यावा - जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

रेस्टॉरंट चालकांनी पाइपलाइनद्वारे गॅस असेल तर त्वरित त्याचा जोड घ्यावा - जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी 

पुणे, ता. २८ - व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या टाक्यांचा पुरवठ्यामध्ये अनेक अडथळे निर्माण झाले आहेत, त्यामुळे रेस्टॉरंट बंद करण्याची वेळ आली आहे. जिल्हा प्रशासनाने याबाबतची स्पष्टता जाहीर करावी, अशी मागणी नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडियाच्या पुणे विभागाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. रेस्टॉरंट चालकांनी त्यांच्या परिसरात पाइपलाइनद्वारे गॅस आला असेल तर त्वरित त्याचा जोड घ्यावा, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

यासंदर्भात, नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया (एनआरएआय) च्या पुणे विभागाचे प्रतिनिधी किशोर सरपोतदार, सायली जहागीरदार व अन्य पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची भेट घेतली व त्यांना निवेदन दिले. रेस्टॉरंट उद्योगांची सद्यःस्थिती डुडी यांच्यासमोर मांडली. गॅसच्या व्यावसायिक सिलिंडरच्या पुरवठ्यावर निर्बंध आले आहेत. त्यामुळे काही रेस्टॉरंट चालकांना त्यांच्याकडील पदार्थ कमी करावे लागले आहेत. काहींनी व्यवसाय बंद ठेवला आहे, या बाबी सांगण्यात आल्या.

त्यावर, रेस्टॉरंट चालकांनी त्यांच्या परिसरात पाइपलाइनद्वारे गॅस आला असेल तर त्वरित त्याचा जोड घ्यावा, रेस्टॉरंट उद्योगासाठी एलपीजीचा पुरवठा काही आठवडद्यांमध्ये टप्प्याटप्याने पुन्हा सुरु होणार आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले, अशी माहिती सायली जहागीरदार यांनी दिली.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories