आरटीई प्रवेशाची सोडत सोमवारी पार पडणार

आरटीई प्रवेशाची सोडत सोमवारी पार पडणार

आरटीई प्रवेश प्रक्रियेची सोडत सोमवारी पार पडणार

पुणे, ता. ४ -  आरटीई प्रवेश अर्ज प्रक्रिया ३१ मार्चला पूर्ण झाली आहे.  शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी या प्रवेश प्रक्रियेची सोडत सोमवारी (ता. ६) रोजी सकाळी ११ वाजता पार पडणार आहे. ही सोडत महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी) येथे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी प्रसिद्धिपत्राद्वारे दिली आहे.

आरटीई प्रवेशाच्या सोडतीचे प्रक्षेपण थेट यू-ट्यूब लिंकद्वारे पाहता येणार आहे. त्यामुळे पालकांना घरी बसूनही ही प्रक्रिया पाहण्याची सुविधा मिळणार आहे. आरटीई प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आणि पारदर्शक आहे. त्यात कोणताही मानवी हस्तक्षेप नसतो. असे प्राथमिक शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

 सोडतीमध्ये प्रवेश मिळणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी, प्रतिक्षा यादी तयार केली जाईल. नंतर शाळांमधीलल प्रत्यक्ष प्रवेश सुरु केले जातील. प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली कोणी प्रलोभन देत असेल तर त्याला बळी पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. 





Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories