news
clock

थेरगावमधील संचेती प्राथमिक विद्यालयाचे विद्यार्थी 'इस्रो'ला भेट देणार  

पिंपरी, ता. ९ - राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या आंतरशालेय विज्ञान प्रदर्शनात थेरगावच्या संचेती प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकवला आहे. या विद्यार्थ्यांना भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) भेटीची संधी मिळाली आहे. या यशामुळे विद्यार्थी व शाळेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

समर्थनाम ट्रस्ट फॉर डिसेबल आणि एफआयएस ग्लोबल यांच्या संयुक्त विद्यमाने हे विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले होते. पुणे शहरातील ४१ हून अधिक शाळांनी सहभाग नोंदवला. विविध वैज्ञानिक संकल्पनांवर आधारित प्रकल्पांमधून विद्यार्थ्यांनी आपली कल्पकता आणि संशोधनवृत्ती दाखवून दिली. या स्पर्धेत संचेती प्राथमिक विद्यालयातील इयत्ता सातवीतील श्रावणी नितीन शिंदे, सार्थक गहिनीनाथ मोहरकर आणि यशराज बालाजी चव्हाण या विद्यार्थ्यांनी 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स व्हॉइस कंट्रोल रोबोट' हा नावीन्यपूर्ण प्रकल्प सादर केला. अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित या प्रकल्पाने परीक्षकांची विशेष दाद मिळवत प्रथम क्रमांक पटकावला.

या यशस्वी कामगिरीबद्दल विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, पदक, स्कूल बॅग आणि भारतीय अवकाश संशोधक संस्थेला भेट देण्याची संधी असे पारितोषिक देण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी मार्गदर्शन करणाऱ्या विज्ञान शिक्षिका नेहा गुमते यांनाही गौरवण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष मोहनलाल संचेती, सचिव वर्षा टाटिया, उपाध्यक्ष आदित्य टाटिया, रेनबो स्कॉलर्सच्या समन्वयक ऐश्वर्या बेदमुथा, मुख्याध्यापक व विभागप्रमुख यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे. 

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories