ज्येष्ठ नागरिकांच्या सहभागातून बुधवारी रंगणार....'संगीत सरिता'
पिंपरी, ता. ७ - पिंपरी-चिंचवड शहर ज्येष्ठ नागरीक महासंघाच्या वतीने 'संगीत सरिता - २०२६' हा सांस्कृतिक कार्यक्रम बुधवारी (ता. ८) आयोजित करण्यात आला आहे. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत हा कार्यक्रम होणार आहे.
शहरातील विविध ज्येष्ठ नागरीक संघातील सदस्यांचा सहभाग...हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य आहे. ज्येष्ठ नागरिकांना सांस्कृतिक व्यासपीठ उपलब्ध करुन देणे हे या कार्यक्रमाचे मुख्य उद्दीष्ट आहे. दरवर्षी ज्येष्ठ नागरीक महासंघातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
ज्येष्ठ नागरीक उत्स्फूर्तपणे या कार्यक्रमाची तयारी करतात. यंदाच्या या सांस्कृतिक सोहळ्यातही शहरातील ज्येष्ठ नागरीकांनी आवर्जून सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.