तरुणाची स्कूटी अडवून त्याला लाकडी दांडक्याने व हातांनी बेदम मारहाण, चाकणमधील प्रकार
पिंपरी, ता. १८ - एका तरुणाची स्कूटी अडवून त्याला लाकडी दांडक्याने व हातांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार चाकण येथील वाडेकर मिसळ हाऊस समोर शनिवारी (ता. १६) घडला आहे.
मारहाणीस बळी पडलेला तरुण शुभम अनिल गोतारणे (वय २७ वर्षे, रा. चाकण) याने तक्रार दिली आहे. आरोपी रोहन महेंद्र घोगरे (वय ३५ वर्षे रा. चाकण) व विवेक कु-हाडे (वय २४ वर्षे, रा. चाकण) यांना पोलिसांनी अटक केली आहे.
आरोपींनी फिर्यादी शुभम चालवत असलेली स्कुटी अडवली व पाठीमागून एकाने शुभमला लाकडी दांडक्याने मारहाण करुन व नाकावर पंच (मुक्का) मारला. आरोपीने स्वतःचे डोके शुभमच्या तोंडावर जोरात आपटून त्याला जखमी केले आहे. एकाने शुभमच्या खिशातील ५,७००/- रुपये जबरीने चोरुन नेले.
आरोपींविरोधात चाकण उत्तर पोलिस ठाण्यात सोमवारी (ता. १८) बी एन एस कलम ३०९ (६), ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.