सुरक्षिततेसाठी पुणे-लोणावळा मार्गावरील सात रेल्वे फाटके बंद केली जाणार

सुरक्षिततेसाठी  पुणे-लोणावळा मार्गावरील सात रेल्वे फाटके बंद केली जाणार

सुरक्षिततेसाठी  पुणे-लोणावळा मार्गावरील सात रेल्वे फाटके बंद केली जाणार 

पिंपरी, ता. १० ऑगस्ट २०२६ - रेल्वेरुळ ओलांडताना होणारे अपघात थांबवण्यासाठी आणि रेल्वेगाड्यांचा सरासरी वेग वाढविण्यासाठी पुणे-लोणावळा मार्गावरील सात रेल्वे फाटके बंद केली जाणार आहेत. त्या ठिकाणी रेल्वे उड्डाणपूल किंवा भुयारी मार्ग उभारण्यात येणार आहेत, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. 

पुणे-लोणावळा मार्गावर रोज सुमारे १५८ गाड्या धावतात. त्यामध्ये लोकल, एक्स्प्रेसबरोबरच वंदे भारत गाड्याही आहेत. त्यातून सुमारे दोन लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. उत्तर आणि दक्षिण भारताला जोडणारा पुणे विभाग महत्त्वाचा विभाग आहे. मुंबईहून सुटणाऱ्या आणि मुंबईला जाणाऱ्या बहुतांश एक्स्प्रेस या मार्गावरून धावतात. याच मार्गावरून पुणे-लोणावळा लोकल आणि मालगाड्याही जातात. 

त्यामुळे,रेल्वेरुळ ओलांडताना होणारे अपघात थांबवण्यासाठी व गाड्यांचा वेग वाढवण्यासाठी रेल्वे फाटके बंद करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. या मार्गावर एकूण नऊ ठिकाणी रेल्वे फाटके आहेत. त्यापैकी सात ठिकाणी उड्डाणपूल उभारण्यास मंजुरीही मिळाली. 

 बंद होणारी रेल्वे फाटके मळवली स्टेशनजवळ (३६ए), कामशेत ते मळवली (३८ए), कामशेत ते वडगाव दरम्यान (४३ए आणि ४५ए), वडगाव स्टेशन जवळ (४९ए), शेलारवाडी स्टेशनजवळ (५२ए), पिंपरी ते दापोडी (६१ए) ही आहेत. 

''पुणे-लोणावळा रेल्वे मार्गावर दापोडी ते खडकी दरम्यान (६२ए, ६२एए) अपघात रोखण्यासाठी सात रेल्वे गेट बंद करण्याचे नियोजन केले आहे. त्याठिकाणी उड्डाणपूल किंवा भुयारी मार्ग उभारण्यात येणार आहे.'', रेल्वेचे पुणे विभागाचे  जनसंपर्क अधिकारी  हेमंतकुमार बेहरा यांनी सांगितले. 



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories