यंदा माझ्या वाढदिवसानिमित्त कोणतेही कार्यक्रम आयोजित करु नये, आमदार शंकर जगताप यांचे आवाहन
यंदा माझ्या वाढदिवसानिमित्त कोणतेही कार्यक्रम आयोजित करु नये, आमदार शंकर जगताप यांचे आवाहन
पिंपरी, ता. ४ - चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांचा वाढदिवस ५ एप्रिलला आहे. त्यांनी यंदाचा आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. वाढदिवसानिमित्त कोणतेही कार्यक्रम, बॅनर्स, होर्डिंग्ज किंवा सार्वजनिक आयोजन करु नये, असे आवाहन त्यांनी स्नेही, कार्यकर्ते व हितचिंतकांना केले आहे. महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे निधन झाले. म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे जगताप यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले.
वाढदिवशी शुभेच्छा स्वीकारण्यासाठी ते जनसंपर्क कार्यालयात उपस्थित राहणार नसल्याचेही त्यांनी सांगितले आहे. ''महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे निधन ही राज्यासाठी अत्यंत वेदनादायी आणि मोठी हानी आहे. अशा दुःखद प्रसंगी आनंदोत्सव साजरा करणे मला योग्य वाटत नाही. त्यामुळे यंदाचा माझा वाढदिवस साधेपणानेही न साजरा करण्याचा निर्णय घेतला असून, सर्वांनी कोणतेही कार्यक्रम, बॅनर्स किंवा होर्डिंग्ज न लावता या निर्णयाला सहकार्य करावे, ही नम्र विनंती.'' असे जगताप यांनी म्हटले आहे.