जमीन खरेदी विक्री प्रकरणात शिवम महंत व मनोज राय यांना न्यायालयाचा दिलासा

जमीन खरेदी विक्री प्रकरणात शिवम महंत व मनोज राय यांना न्यायालयाचा दिलासा

जमीन खरेदी विक्री प्रकरणात शिवम महंत व मनोज राय यांना न्यायालयाचा दिलासा 

पिंपरी, ता. ११ ऑगस्ट २०२६ - पिंपरी-चिंचवड न्यायालयीन वर्तुळात सध्या चर्चेत असलेल्या जमीन खरेदी विक्री प्रकरणातील एका घटनेत शिवम महंत व मनोज राय यांना बजावण्यात आलेले अजामीनपात्र वॉरंट रद्द करून त्यांना जामीन देण्यात आला आहे. 

हवेली तालुक्यातील शिरसवाडी येथील प्लॉटिंग प्रकरणात त्यांच्याविरुद्ध निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली होती.  पिंपरी येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी  दोघांचे अजमीन पात्र वॉरंट दिनांक ७ ऑगस्ट रोजी रद्द केले. मनोज राय यांना या आधी 2023 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन दिला होता त्याची शहानिशा करून मनोज राय यांचा जामीन मंजूर केला.

दरम्यान शिवम महंत व मनोज राय यांचे वकील ॲड प्रसन्न लोखंडे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले की, आमच्या अशिलांना सदर प्रकरण न्यायालयासमोर प्रलंबित असल्याची कोणतीही माहिती नव्हती, तसेच त्यांना मा. न्यायालयाकडून या प्रकरणामध्ये उपस्थित राहण्यासाठी कोणतेहीu समन्स प्रत्यक्षरित्या प्राप्त झालेले नव्हते, त्यामुळे जारी करण्यात आलेले  अजामीनपात्र वाॅरंट रद्द करणे न्यायाच्या दृष्टीने योग्य व आवश्यक होते असे ॲड लोखंडे यांनी स्पष्ट केले.











Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories