शिवसेना-शिव उद्योग सहकार सेनेच्या पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी संभाजी हिरामण भेगडे यांची नियुक्ती

शिवसेना-शिव उद्योग सहकार सेनेच्या पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी संभाजी हिरामण भेगडे यांची नियुक्ती

शिवसेना-शिव उद्योग सहकार सेनेच्या पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी संभाजी हिरामण भेगडे यांची नियुक्ती

पिंपरी, ता. २७ - शिवसेनेचे मुख्य नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार, संभाजी हिरामण भेगडे यांची शिवसेना-शिव उद्योग सहकार सेनेच्या पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी महत्त्वाची नियुक्ती करण्यात आली आहे. 

मुंबईतील ‘बाळासाहेब भवन’ येथे झालेल्या विशेष कार्यक्रमात शिवसेना सचिव संजय मोरे यांच्या हस्ते संभाजी भेगडे यांना अधिकृत नियुक्तीपत्र देऊन त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. खासदार श्रीकांत शिंदे, शिवसेना सचिव संजय मोरे आणि मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिवसेना-शिव उद्योग सहकार सेनेचे प्रदेशाध्यक्ष रामेश्वर वाडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा नियुक्तीपत्र प्रदान सोहळा पार पडला.

या सोहळ्याला पुणे शहराध्यक्ष सदानंद कडलक, चित्रपट सेनेचे राज्य समन्वयक शुभम लोखंडे, लातूरचे संघटक पलांडे, कार्यालयीन सचिव पांडुरंग पाटील आणि राज्य समन्वयक विपुल चेपट यांच्यासह पिंपरी-चिंचवड व परिसरातील शिवसैनिक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या महत्त्वपूर्ण नियुक्तीमुळे पिंपरी-चिंचवड या औद्योगिक नगरीत शिवसेना-शिव उद्योग सहकार सेनेला नवीन ऊर्जा मिळण्याची शक्यता वर्तवली जात असून, स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

यावेळी संभाजी भेगडे यांनी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, ''पक्षाने माझ्यावर टाकलेला हा विश्वास मी सार्थ करून दाखवेन. पिंपरी-चिंचवड शहरात पक्ष संघटना मजबूत करणे हेच माझे मुख्य उद्दिष्ट असेल. सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवून, तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचून मुख्यनेते एकनाथजी शिंदे साहेब यांचे हात अधिक बळकट करण्यासाठी मी अहोरात्र काम करेन. पक्षाने दिलेली ही मोठी जबाबदारी मी अत्यंत सक्षमतेने पार पाडीन.''




Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories