सिंहगड परिसर आज व उद्या पर्यटनासाठी बंद राहणार, पुणे वन विभागाचा निर्णय
पुणे, ता. ६ जुलै २०२६ - भारतीय हवामान विभागाने (IMD) पुणे जिल्ह्यासाठी ६ व ७ जुलैला मंगळवारी रोजी रेड अलर्ट जारी केला आहे. सर्वत्र मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने सिंहगड घाट परिसर पर्यटकांसाठी ६ व ७ जुलै (सोमवारी व मंगळवारी) तात्पुरता बंद ठेवला जाणार आहे, पुणे वनविभागाने स्पष्ट केले आहे. नागरिकांनी रेड अलर्टच्या कालावधीत सिंहगड परिसरात पर्यटनासाठी जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
सिंहगड घाट परिसर हा दरडप्रवण क्षेत्र असल्याने मुसळधार पावसामुळे दरड कोसळणे, दगड घसरणे, झाडे उन्मळून पडणे, रस्त्यावर पाणी साचणे तसेच इतर नैसर्गिक आपत्ती उद्भवण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील आदेशापर्यंत पर्यटकांना प्रवेश दिला जाणार नसल्याची माहिती पुणे उपवनसंरक्षक माधव मोहिते यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
नागरिकांनी रेड अलर्टच्या कालावधीत सिंहगड परिसरात पर्यटनासाठी जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच घाट परिसरात किंवा दरडीच्या पायथ्याशी थांबू नये, वेगवान प्रवाह असलेले ओढे-नाले अथवा पूरग्रस्त भाग ओलांडण्याचा प्रयत्न करू नये. प्रशासन, पोलीस तसेच वनविभागाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे,
सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत सूचनांवरच विश्वास ठेवावा. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती आढळल्यास तात्काळ स्थानिक प्रशासन, पोलीस किंवा वनविभागाशी संपर्क साधावा, असे अशी सूचना देण्यात आली आहे.
- अतिवृष्टी, Very Heavy Rain
- पर्यटन बंद, Tourism Closed, Tourists Entry Ban, घाट बंद, Ghat Closed, IMD रेड अलर्ट, IMD Red Alert, Indian Meteorological Department, मुसळधार पाऊस, Heavy Rain, अतिवृष्टी, Very Heavy Rain, Rain Alert,
- सिंहगड, Sinhagad Fort, सिंहगड घाट, Sinhagad Ghat, पुणे, Pune, पुणे वन विभाग, Pune Forest Department, Forest Department Pune