दुरुस्तीच्या कामासाठी तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्यावरील पुलावरील सर्व प्रकारची वाहतूक १४ जुलैपर्यंत बंद

दुरुस्तीच्या कामासाठी तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्यावरील पुलावरील सर्व प्रकारची वाहतूक १४ जुलैपर्यंत बंद

दुरुस्तीच्या कामासाठी तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्यावरील पुलावरील सर्व प्रकारची वाहतूक १४ जुलैपर्यंत बंद

पिंपरी, ता. ७ जुलै २०२६ - गेले चार दिवस सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्यावरील महाळुंगे पोलिस स्टेशन जवळील पुलाचा भराव अतिवृष्टीमुळे खचत असून हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनलेला आहे. पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरु आहे. मात्र, सततचया वाहतुकीमुळे पुन्हा निर्माण होणारा धोका लक्षात घेऊन पुलावरील सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्यात येत आहे. त्या बाबतचे पत्र सार्वजनिक बांधकाम प्रकल्प विभागाकडून स्थानिक कार्यालयास पाठवण्यात आले आहे. त्यानुसार, पुलावरील वाहतूक बंद ठेवण्याबाबतचे आदेश पिंपरी-चिंचवड शहर वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख यांनी जारी केले आहेत.   

त्यानुसार,  एच. पी. चौक ते पोलिस स्टेशन चौकाकडे जाणारे सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीस ७ जुलै ते १४ जुलै या कालावधीत मनाई करण्यात येत आहे. . वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे. महाळुंगे वाहतूक विभागांतर्गत हे बदल करण्यात आले आहेत. 

- एच. पी. चौक ते पोलीस स्टेशन चौकाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीस मनाई करण्यात येत आहे.

पर्यायी मार्गः-१. चाकण कडे जाणारी वाहतुक एच पी चौक ते इंडोरन्स चौक ते सिग्मा ते व्ही. डब्लु कॉर्नर ते एआर-एआई चौक ते स्पायसर चौकमार्गे इच्छितस्थळी जातील.

२. महिंद्रा, तळवडे कडे जाणारी वाहतुक एच. पी चौक ते इंड्युरन्स चौक ते सिग्मा ते व्ही. डब्लु कॉर्नर ते महिंद्रा सर्कल चौक मार्गे इच्छित स्थिळी जातील

चाकण चौक ते एच. पी चौक जाणारे सर्व प्रकारचे वाहनांचे वाहतुकीस मनाई करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग :- १. चाकण ते एच. पी चौक जाणारी वाहतुक वाघजाईनगर ते बिरदवाडी चौक मार्गे इच्छितस्थळी जातील.

३. चाकण ते एच. पी चौक जाणारी वाहतुक महाळुंगे गाव कमान ते आंबेठाण/बिरदवडी चौक मार्गे इच्छितस्थळी जातील.



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories