प्रसिद्ध अभिनेते विजय थलपती तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान
पुणे, ता. ११ - प्रसिद्ध अभिनेते विजय थलपती यांनी रविवारी (ता. १०) चेन्नई येथील नेहरु स्टेडियममध्ये तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या भव्य शपथविधी सोहळ्याला राजकीय तसेच चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते. तामिळगा वेत्री कळघम (TVK) पक्षाचे प्रमुख सी. जोसेफ विजय यांनी तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांच्यासमोर मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
या सोहळ्याला लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी उपस्थित होते. चेन्नईतील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये विजय आणि राहुल गांधी एकत्र दिसल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. दरम्यान, अभिनेत्री तृषा कृष्णन, तामिळनाडू भाजपचे अध्यक्ष नैनार नागेंद्रन आणि भाजप नेत्या तमिळीसाई सुंदरराजन यावेली उपस्थित होते. शपथविधी स्थळी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी विजय यांनी राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांचे स्वागत केले. तामिळनाडू विधानसभेच्या 234 जागांसाठी 23 एप्रिल रोजी निवडणूक झाली. या निवडणुकीत टीव्हीके पक्ष १०८ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला.
विजय यांच्यासोबत तमिळनाडू मंत्रिमंडळासाठी नऊ मंत्र्यांनी शपथ घेतली. राज्यपालांनी त्या यादीला मंजुरी दिली. लोक भवन, तमिळनाडू येथून १० मे २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिकृत प्रसिद्धीपत्रकात ही माहिती देण्यात आली.
मंत्रिपदासाठी मंजुरी मिळालेल्या सदस्यांची नावे -
एन. आनंद, आधव अर्जुना, डॉ. के. जी. अरुणराज, के. ए. सेंगोट्टैयन, पी. वेंकटरमणन, आर. निर्मलकुमार, राजमोहन, डॉ. टीके प्रभू, एस. कीर्तन
- निवडणूक, Election, 234 विधानसभा जागा, 234 Assembly Seats, मंत्रिमंडळ, Cabinet, 9 मंत्री, 9 Ministers,
- टीव्हीके, TVK, सी. जोसेफ विजय, C. Joseph Vijay, राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर, Rajendra Vishwanath Arlekar, राहुल गांधी, Rahul Gandhi, तृषा कृष्णन, Trisha Krishnan,
- , नेहरू स्टेडियम, Nehru Stadium, शपथविधी, Swearing-in Ceremony,
- विजय थलपती, Vijay Thalapathi, तामिळनाडू मुख्यमंत्री, Tamil Nadu Chief Minister,