जलसमृद्ध पुण्यासाठी खडकवासला धरण येथे पारंपरिक जलपूजन सोहळा

जलसमृद्ध पुण्यासाठी खडकवासला धरण येथे पारंपरिक जलपूजन सोहळा

जलसमृद्ध पुण्यासाठी खडकवासला धरण येथे पारंपरिक जलपूजन सोहळा

पिंपरी, ता.  ८ जुलै २०२६ -   खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने आज, बुधवारी (ता. ८)  पुणे महानगरपालिकेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर पारंपरिक पद्धतीने जलपूजन करण्यात आले. यावेळी साडी, चोळी व नारळ अर्पण करून जलदेवतेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. तसेच पुणेकरांना वर्षभर पुरेसा पाणीपुरवठा व्हावा आणि शहरामध्ये पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.

याप्रसंगी आमदार भीमराव तापकीर,  महापौर मंजुषा नागपुरे,  उपमहापौर परशुराम वाडेकर, नगरसेवक  सोपान चव्हाण,  नगरसेवक सचिन मोरे,  नगरसेवक प्रसन्न जगताप,  नगरसेवक  सुभाष नाणेकर,  नगरसेवक भारत भूषण बराटे, नगरसेविका कोमल नवले,  नगरसेविका जयश्री भुमकर, सहकारी नगरसेवक, स्थानिक नागरिक, पुणे महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी तसेच पाटबंधारे विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories