मे महिन्यात वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ६२ हजार ७२७ वाहन चालकांवर कारवाई, ६ कोटी ७६ लाख ३० हजारांचा दंड वसूल

मे महिन्यात वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ६२ हजार ७२७ वाहन चालकांवर कारवाई, ६ कोटी ७६ लाख ३० हजारांचा दंड वसूल

मे महिन्यात वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ६२ हजार ७२७ वाहन चालकांवर कारवाई, ६ कोटी ७६ लाख ३० हजारांचा दंड वसूल

पिंपरी, ता. २ - वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेकडून दैनंदिन दंडात्मक कारवाई केली जाते. १ ते ३१ मे २०२६ या कालावाधीत वाहतूक शाखेने एकूण ६२ हजार ७२७ वाहन चालकांवर कारवाई करुन एकूण ६ कोटी ७६ लाख ३० हजार ९००/- रुपये दंड आकारण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेकडून ही माहिती देण्यात आली आहे. 

या कारवाईमध्ये, नंबर प्लेट विषयक कारवाई - ५४७५ जणांवर, डेंजर ड्रायव्हींग कारवाई - २८४ जणांवर, मोबाईल टॉकिंग कारवाई - १९९३ जणांवर, सिग्नल जंम्पींग कारवाई - ८४८३ वाहनचालकांवर, ट्रिपल सिट कारवाई - ६५३९ वाहनचालकांवर, ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह -४०२ जणांवर, जड अवजड वाहन कारवाई - ८१४२ जणांवर, काळी काच कारवाई - ३०९० जणांवर, मॉडिफाईड सायलेंसर कारवाई - १०३२ वाहनचालकांवर, राँग साईड कारवाई - २३९ जणांवर, बसेस कारवाई - ३४९० चालकांवर, रिक्षा कारवाई - ३१०२ चालकांवर, विना परवाना कारवाई - ८७० वाहनचालकांवर, टोईंग कारवाई - ११५८० वाहनांवर, वाहतूकीस अडथळा /नो पार्किंग कारवाई - १९३४० वाहनांवर, लायसन निलंबन कारवाई - १६६ जणांवर व हेल्मेट कारवाई - ४२९ जणांवर करण्यात आली आहे. त्याद्वारे एकूण ६,७६,३०,९००/- दंड आकारण्यात आला आहे.


पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात चाकण, भोसरी, तळेगाव हि औद्योगिक क्षेत्रे तसेच हिंजवडी, तळवडे, चिखली ही आयटी पार्क क्षेत्रे आहे. देहू व आळंदी ही धार्मिक स्थळे आहेत. पिंपरी बाजारपेठ ही  सर्वात मोठी बाजारपेठ आहे. पिंपरी-चिंचवड आयुक्तलय कार्यक्षेत्रातून एकूण ५ महत्त्वाचे महामार्ग जातात. त्यामुळे वाहनांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे आणि परिणामी वाहनांशी निगडीत अपराधांमध्ये तसेच वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघनात वाढ झालेली आहे. वाहन चालकांना वाहतुकीचे नियम मोडण्यास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेकडून वाहनचालकांवर दैनंदिनरित्या कारवाई करण्यात येते, असे वाहतूक शाखेने स्पष्ट केले आहे. 

''नागरीकांनी वाहतूक नियमांचे पालन करुन त्यांचेवर होणारी दंडात्मक तसेच न्यायालयीन कार्यवाही टाळावी.'', असे आवाहन पिंपरी चिंचवड वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख यांनी केले आहे. 






Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories