news
clock

ट्रकच्या धडकेत ३५ वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू

पिंपरी, ता. ११ - महाळुंगे येथील मुळा नदीच्या पुलावर ट्रकच्या धडकेत ३५ वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू  झाला आहे.  हिंजवडीकडून चांदणी चौकाच्या दिशेने जात असताना सोमवारी (ता. ९) हा अपघात झाला आहे. आरोपीवर मंगळवारी (ता. १०) बावधन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 फिर्यादी प्रितीश पद्माकर ठाकरे (वय ३५, राहणी बाणेर, पुणे) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. फिर्यादीचे मित्र अभिजीत घाडगे हे हिंजवडीकडून चांदणी चौकाच्या दिशेने मोटारसायकलवर जात होता.  मुळा नदीच्या पुलावर भरधाव ट्रकने अभिजीतच्या मोटारसायकला मागून जोरात धडक दिली. तो गंभीर जखमी झाला आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

 ट्रक क्रमांक MH 25 U131 चालवणारा आरोपी शरद दत्तु मोरे (वय ३६, राहणी तलमोड, जि. धाराशीव) भरधाव गतीने, निष्काळजीपणे ट्रक चालवत होता. आरोपीला अद्याप अटक केली नाही.प्रकरणी गुन्हा कलम २८१, ३२४ (४) भारतीय दंड संहिता व मो.वा. कलम १८४, ११९/१७७ अंतर्गत नोंदवण्यात आला आहे.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories