महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त पदावर उमा अभय दरवेश यांची नियुक्ती

महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त पदावर उमा अभय दरवेश यांची नियुक्ती

 महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त पदावर उमा अभय दरवेश यांची नियुक्ती 

पिंपरी, ता. ४ - पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील अभिलेख कक्षाच्या प्रशासन अधिकारी  उमा अभय दरवेश (पुलगम) यांना महापालिका प्रशासनाने सहाय्यक आयुक्त (वर्ग-१) पदाचा अतिरिक्त पदभार नुकताच प्रदान केला आहे. करसंकलन,आरोग्य, जकात, अभिलेख व्यवस्थापन तसेच विविध प्रशासकीय जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडत त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. त्यांच्या दीर्घ अनुभवाची दखल घेत महानगरपालिका प्रशासनाने त्यांच्यावर "सहाय्यक आयुक्त" (वर्ग-१) पदाची अतिरिक्त जबाबदारी सोपविली आहे.

 पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये बदल केले आहेत. अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांच्या स्वाक्षरीने स्वतंत्र आदेश दिले आहेत. उमा दरवेश पुलगम यांना महानगरपालिकेतील विविध विभागांमध्ये प्रदीर्घ प्रशासकीय कामाचा अनुभव असून, त्यांनी आपल्या सेवाकाळात प्रामाणिकपणा, कार्यतत्परता, चिकाटी आणि नियमांचे काटेकोर पालन यामुळे स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. प्रशासनातील गुंतागुंतीची कामे कार्यक्षमतेने हाताळण्याची त्यांची क्षमता तसेच शासकीय नियमांचे सखोल ज्ञान यामुळे त्या अधिकारी व कर्मचारी वर्गात  शिस्त व नियमानुसार काम करणाऱ्या अधिकारी अशी ओळख आहे. 

उमाताई महानगरपालिकेमध्ये  सन १९८९ मध्ये लिपिक (वर्ग-३) पदावर सेवेत रुजू झाल्या.  त्यानंतर, उत्तम काम करत उच्च प्रशासकीय पदापर्यंत मजल मारणाऱ्या उमा पुलगम दरवेश या महिला कर्मचाऱ्यांसाठी प्रेरणादायी आहेत. ॲथलेटिक्स खेळाडूदेखील आहेत. त्यांच्या या नियुक्तीबद्दल महापालिकेतील सहकाऱ्यांकडून आणि विविध क्षेत्रांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. विविध स्तरांतून त्यांचे  अभिनंदन करण्यात येत आहे.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories