'यूपीएससी' परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांचा सत्कार
पुणे, ता. २७ - मुंबईतील राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थेतर्फे आयोजित कार्यक्रमात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते केंद्रिय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांचा सत्कार करण्यात आला.
भारतीय प्रशासकीय सेवा ही देशाच्या विकासाचा मजबूत आधारस्तंभ आहे. प्रशिक्षण केंद्र विद्यार्थ्यांना केवळ परीक्षेची तयारी करून देत नाहीत, त्यांच्यात नेतृत्वगुण आणि सामाजिक बांधिलकीची भावना रुजवत असते. अशा संस्थाची व्याप्ती वाढविण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असून पुणे येथे प्रशिक्षण संस्था सुरु करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाच्या विचाराधीन आहे, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे संचालक शैलेंद्र देवळाणकर, राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थेच्या संचालक डॉ. भावना पाटोळे उपस्थित होते.
- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, Higher and Technical Education Minister, मुंबई, Mumbai, राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था, State Institute for Administrative Careers,
- चंद्रकांत पाटील, Chandrakant Patil, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, Higher and Technical Education Minister,
- यूपीएससी यशस्वी उमेदवार, UPSC Successful Candidates, सत्कार समारंभ, Felicitation Ceremony,