news
clock
प्रेमरंगात रंगले श्रोते, 'दिल की धडकन' संगीत मैफिलीला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रेमरंगात रंगले श्रोते, 'दिल की धडकन' संगीत मैफिलीला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रेमरंगात रंगले श्रोते, 'दिल की धडकन' संगीत मैफिलीला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 

पिंपरी, ता. १५ - 'व्हॅलेंटाईन्स डे'निमित्त निगडी-प्राधिकरणात 'दिल की धडकन' ही प्रेमगीतांची सुरेल मैफील रंगली. 'तू ही रे', 'इस प्यार से मेरी तरफ' 'हम प्यार करनेवाले', 'मेरा दिल भी कितना पागल है', 'ए मेरे हमसफर', 'जानेमन जानेमन', 'इस प्यार से मेरी तरफ', 'बादल यू गरजता हैं', 'तू ही रे' अशा गीतांच्या श्रवणाने श्रोते प्रेमरंगात रंगून निघाले.

इंडियन म्युझिकल क्लबच्या वतीने ही संगीत मैफिल निगडी-प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात झाली. श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. राखी झोपे आणि अनिल झोपे या दांपत्याच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम सादर झाला. या मैफलीत विजय किल्लेदार, भारती किल्लेदार, किरण वैद्य, अनिल झोपे, राखी झोपे, राजेश कुलकर्णी, कविता शाह, वेंकट श्रीनिवास, सदानंद भोसले, स्वप्निल शेठ, श्रीया दास, स्वाती केसकर या गायकांनी सादरीकरण केले.

'हमको सिर्फ तुमसे प्यार', 'देखा एक ख्वाब तो', 'दिल हैं के मानता नहीं', 'हो गया हैं तुज को तो प्यार', 'तुम्ही देखो ना', 'कभी मैं कहू', 'आजा शाम होने आयी' अशी अनेक प्रेमगीते सादर झाली. रंगमंचावर हृदयाच्या आकारांचे गुलाबी फुगे  आकर्षकरीत्या मांडून देखणी सजावट लक्ष वेधून घेत होती. आदिती खटावकर यांनी निवेदन केले.  

--------------------------------------------------------------------------------------------


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Recent News

Top Categories