news
clock
हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो एप्रिल अखेरपर्यंत टप्प्याटप्याने सुरु होणार

हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो एप्रिल अखेरपर्यंत टप्प्याटप्याने सुरु होणार

हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो एप्रिल अखेरपर्यंत टप्प्याटप्याने सुरु होणार

पिंपरी, ता. १७ - हिंजवडी ते शिवाजीनगर (मेट्रो लाइन ३) मेट्रो एप्रिल अखेरपर्यंत टप्प्याटप्याने सुरु होणार आहे.  या २३ किलोमीटर लांबीच्या 'रेड लाइन' मेट्रोच्या चाचण्या यशस्वीरीत्या पूर्ण झाल्या आहेत. हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोमार्ग सुरु झाल्यास हिंजवडी आयटी पार्कमध्ये वेगाने पोचता येणार आहे, असे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए)  सांगितले आहे.  

'पीएमआरडीए'ने या महत्त्वाच्या मार्गावर दोन्ही दिशांनी मेट्रोची चाचणी घेतली, ती यशस्वी झाली. 

प्रकल्पाचे सुमारे ९० टक्के स्थापत्य काम पूर्ण झाले आहे. आता व्यावसायिक सेवेसाठी मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडे परवानगी मागितली आहे, असे 'पीएमआरडीए'कडून सांगण्यात आले. सर्व स्थानके एकाचवेळी सुरु न करता, ज्या स्थानकांचे काम १०० टक्के पूर्ण झाले आहे, ती प्रथम प्रवाशांसाठी खुली केली जातील. उर्वरित कामे पूर्ण होताच, इतर स्थानके सुरु केली जातील. शिवाजीनगर येथे ही 'रेड लाइन मेट्रो' सध्याच्या 'अॅक्वा' व 'पर्पल' मेट्रो लाइनशी जोडली जाणार आहे. 

हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गामुळे हिंजवडी परिसरात जाण्यासाठीच्या वेळेत बचत होणार आहे. विस्तारणाऱ्या मेट्रोच्या जाळ्यामुळे पुणे शहरात कोठेही जाणे सोयीचे होत आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories