पुणे शहर / जिल्हा
'पीएमपीएमएल'च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी विजयकुमार सरनाईक यांची नियुक्ती
May 11 2026
53
'पीएमपीएमएल'च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी विजयकुमार सरनाईक यांची नियुक्ती
पुणे, ता. ११ - पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी विजयकुमार सरनाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज सोमवारी (ता. ११) सरनाईक यांनी नवीन पदभार स्वीकारला.
परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मा. श्री. महेश आव्हाड साहेब व सहव्यवस्थापकीय संचालक अॅलिस पोरे यांच्या कडून कामकाजाची माहिती घेतली. महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाकडून दिनांक २३ एप्रिल २०२६ रोजी प्रतिनियुक्तीने सरनाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे, पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून ही माहिती देण्यात आली आहे.