मतदारयादी विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेबाबत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक

मतदारयादी विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेबाबत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक

मतदारयादी विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेबाबत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक

पिंपरी, ता. २७ - भारत निवडणूक आयोगामार्फत राज्यात राबविण्यात येणाऱ्या मतदारयादी विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेबाबतची माहिती देण्यासाठी राष्ट्रीय व राज्यस्तरीय राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. त्या बैठकीस विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. पिंपरी विधानसभा मतदारसंघाच्या बैठकीमध्ये मोहिमेतील सविस्तर कामकाज, वेळापत्रक आदींची माहिती मतदार नोंदणी अधिकारी अर्चना यादव यांनी दिली.

३० जूनपासून एन्युमरेशन फॉर्मचे वाटप मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्यामार्फत सुरू होणार आहे. प्रारूप मतदारयादी ५ ऑगस्टला प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर हरकतींवर सुनावणी घेऊन मुख्य यादी ७ ऑक्टोबरला प्रसिद्ध होणार आहे. या मोहिमेसाठी राजकीय पक्षांनी यादीनिहाय बीएलएची नियुक्त्ती करणे आवश्यक आहे. या कालावधीत मतदारयादी अद्ययावत व अचूक करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्यामध्ये सर्व राजकीय पक्षांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे, असे अर्चना यादव यांनी सांगितले. 


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories