मेसमधील गैरसमजातून तरुणाला टोळक्याची मारहाण; डाव्या हाताला फ्रॅक्चर

मेसमधील गैरसमजातून तरुणाला टोळक्याची मारहाण; डाव्या हाताला फ्रॅक्चर

मेसमधील गैरसमजातून तरुणाला टोळक्याची मारहाण; डाव्या हाताला फ्रॅक्चर


पिंपरी चिंचवड , दि. २१ ऑगस्ट २०२६ : मेसमध्ये झालेल्या गैरसमजातून २५ वर्षीय तरुणाला सहा ते सात जणांनी मारहाण केल्याचा प्रकार वाकडमधील एकता कॉलनी येथे घडला. या मारहाणीत तरुणाच्या डाव्या हाताला फ्रॅक्चर झाले आहे. याप्रकरणी वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत धनेश पोपट डोंगरे (वय २५) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांच्या नोंदीनुसार, आदिनाथ कुलकर्णी विघ्नेश आणि त्याच्या पाच ते सहा साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित साथीदारांची संपूर्ण नावे आणि पत्ते अद्याप निष्पन्न झालेले नाहीत.

पोलिसांच्या माहितीनुसार, १९ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री सव्वादहा वाजण्याच्या सुमारास वाकडमधील एकता कॉलनी परिसरात ही घटना घडली. धनेश डोंगरे हे नेहमीप्रमाणे राजमाता मेसमध्ये जेवण करण्यासाठी गेले होते.

जेवण केल्यानंतर ते आपल्या विकास नावाच्या मित्रासोबत जेवणाबाबत बोलत होते. त्यावेळी समोरील व्यक्तीला डोंगरे हे आपल्यालाच उद्देशून बोलत असल्याचा गैरसमज झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या गैरसमजातून दोघांमध्ये सुरुवातीला किरकोळ वाद झाला. त्यानंतर संबंधित व्यक्तीने आपल्या पाच ते सहा मित्रांना घटनास्थळी बोलावल्याचा आरोप आहे.

त्यानंतर सर्वांनी मिळून डोंगरे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून खाली पाडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या मारहाणीत त्यांच्या डाव्या हाताला फ्रॅक्चर झाले.

याप्रकरणी वाकड पोलिसांनी गुन्हा क्रमांक ४२४/२०२६ दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

टीप : या बातमीतील मारहाणीचे आरोप हे फिर्यादी आणि पोलिसांच्या नोंदीवर आधारित आहेत. संबंधित आरोप अद्याप न्यायालयात सिद्ध झालेले नाहीत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories