वारली लोककला उलगडणारे ‘द वारली लेगसी’ प्रदर्शनाचे उद्या पुण्यात उद्घाटन
पिंपरी, ता. २० जुलै २०२६ - ‘द वारली लेगसी-पारंपरिक ते आधुनिक’हे चित्रप्रदर्शन २१ ते २६ जुलैदरम्यान शिवाजीनगर येथील राजा रविवर्मा आर्ट गॅलरीमध्ये भरविण्यात येणार आहे.
आर्ट पुणे फाउंडेशन, चौकोन आर्टिस्ट्स आणि वारली आर्टिस्ट्स यांच्यातर्फे या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. मंगळवारी (ता. २१) सायंकाळी ५ वाजता उद्घाटन होणार आहे. पद्मश्री जिव्या सोमा म्हसे यांच्या ९० व्या जयंतीनिमित्त डहाणू येथे झालेल्या कला शिबिरातून साकारलेल्या कलाकृती या प्रदर्शनात मांडण्यात येणार असून, प्रदर्शनात ३८
कलाकारांनी सहभाग घेतला आहे, अशी माहिती चौकोन संस्थेच्या हर्षदा कोळपकर यांनी दिली. प्रदर्शन दररोज सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत खुले राहणार आहे.