निगडी | 31 ऑगस्ट 2026 : निगडी परिसरात विक्रीच्या उद्देशाने गांजा बाळगल्याप्रकरणी एका तरुणाला पोलिसांनी अटक केली. आरोपीच्या ताब्यातून 3 हजार 950 रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई 29 ऑगस्ट रोजी रात्री 9:10 वाजण्याच्या सुमारास काळभोर गोठा ते संजय हॉटेल या मार्गावरील गल्लीच्या कडेला करण्यात आली. याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट-1 मधील पोलीस कर्मचारी दीपक भिमराव तांदळे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी मन्नूकुमार नंदकिशोर चौधरी वय २७ , सध्या रा. लंडन ब्रिजजवळ, रावेत; मूळ रा. बिहार, याला अटक केली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी संशयास्पद अवस्थेत थांबलेला आढळला. त्याची तपासणी केली असता त्याच्या ताब्यात गांजा आढळून आला. जप्त अमली पदार्थाची किंमत 3 हजार 950 रुपये आहे. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 636/2026 नोंदवण्यात आला असून एनडीपीएस कायद्यातील संबंधित कलमांनुसार पुढील तपास सुरू आहे.