अजितदादांच्या अस्थिकलशाचे आज पिंपरीत दर्शन घेता येणार

अजितदादांच्या अस्थिकलशाचे आज पिंपरीत दर्शन घेता येणार

अजितदादांच्या अस्थिकलशाचे आज पिंपरीत दर्शन घेता येणार

पिंपरी, ता. ३ - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) यांच्या वतीने आज मंगळवारी (ता. ३) राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अस्थिकलशाचे दर्शन अजितदादांच्या चाहत्यांना घेता येणार आहे. पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकातील प्रांगणात सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत अजितदादांचा अस्थिकलश दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती पक्षाचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी दिली आहे.

यावेळी, आजी-माजी खासदार, आमदार, नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. हा अस्थिकलश दर्शनानंतर देहू येथील इंद्रायणी नदीत विधिवत विसर्जित करण्यात येणार आहे, असे बहल यांनी सांगितले.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories