व्हॉट्सअॅप हॅक अन् बॅंक खात्यातून ७ लाख रुपयांचा अपहार, अज्ञात व्यक्तीवर गुन्हा

व्हॉट्सअॅप हॅक अन् बॅंक खात्यातून ७ लाख रुपयांचा अपहार, अज्ञात व्यक्तीवर गुन्हा

व्हॉट्सअॅप हॅक अन् बॅंक खात्यातून ७ लाख रुपयांचा अपहार, अज्ञात व्यक्तीवर गुन्हा 

पिंपरी, ता. ३ - व्हॉट्सअॅप हॅक करुन त्याद्वारे वापरात असलेल्या बॅंक अकाउंटमधून ७ लाख ४१ हजार ६७१/- रुपये स्वतःच्या अकाऊंटमध्ये ट्रासन्फर भोसरी येथील एका व्यक्तीची फसवणूक अज्ञात व्यक्तीने केली आहे. १ जानेवारी २०२६ ला ही घटना घडली असून अज्ञात आरोपीवर भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

याबाबत, परीमल नबकृष्ण परीडा (वय ३२ वर्षे, व्यवसाय, रा. भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ जानेवारी २०२६ ला अज्ञात व्यक्तीने फिर्यादीचे व्हाट्सअप हॅक केले आणि  फिर्यादी वापरत असलेल्या बँकेच्या खात्यातून अज्ञात व्यक्तीने ७ लाख ४१ हजार ६७१/- रुपये स्वतःच्या अकाऊंटमध्ये ट्रासन्फर केले. 

अज्ञात आरोपीविरोधात भोसरी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४) व माहिती तंत्रज्ञान अधिनियमकलम ६६ (सी) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. 


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories