news
clock
उद्यापासून वाहन परवाना चाचणी सकाळी सातपासूनच

उद्यापासून वाहन परवाना चाचणी सकाळी सातपासूनच

उद्यापासून वाहन परवाना चाचणी सकाळी सातपासूनच

पिंपरी, ता. १८ - पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) उन्हाळ्यातील वाढत्या तापमानामुळे सकाळी सात वाजल्यापासून वाहनचालक (ड्रायव्हिंग लायसन्स) चाचणी सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारपासून (ता. २०) या निर्णयाची अंमलबजावणी होईल.

सकाळी सातपासून त्या दिवसातील सर्व अपॉइंटमेंट पूर्ण होईपर्यंत चाचण्या सुरु राहतील. त्यामुळे वाहन चालकांनी सकाळी लवकर येऊन चाचणी द्यावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल जाधव यांनी केले. 

वाहनचालकांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून आरटीओने चाचणीची वेळ सकाळी सातपासूनच सुरु केली आहे. 

----------------------------------------------------------------------------------------------------------

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories