news
clock

''छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी दिलेला ठेका तत्काळ रद्द करावा, अन्यथा रस्त्यावर उतरुन आंदोलन करु''

विरोधकांचा इशारा, महापालिका प्रवेशद्वारावर आंदोलन, आयुक्तांना दिले निवेदन 

पिंपरी, ता. १८ - मोशीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येत आहेत. यासाठी ५० कोटींच्या खर्चाला मंजूरी देण्यात आली आहे. पुतळा परिसरात स्थापत्य व विद्युत विषयक कामे केली जाणार आहेत. मात्र, निविदा प्रक्रिया, ठेकेदार नियुक्तीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत विरोधकांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन केले. ''हा ठेका तत्काळ रद्द करावा, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरु'' असा इशाराही त्यांनी दिला. महापालिका आयुक्तांची भेट घेऊन त्यांना  याबाबत निवेदन दिले. 

या आंदोलनात विरोधात विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, शिवसेनेच्या नगरसेविका सुलभा उबाळे, शिवसेनेचे गटनेते विश्वजीत बारणे, नगरसेवक संदीप वाघेरे, पंकज भालेकर, शेखर चिंचवडे, यश साने, विराज लांडे, संतोष कोकणे, सागर कोकणे, संगीता ताम्हाणे, दिप्ती कांबळे, उज्ज्वला ढोरे, सविता आसवानी, रेश्मा कातळे, निकीता कदम, वर्षा जगताप, प्रियांका कुदळे सहभागी झाले.

छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचा कारभार पारदर्शक नाही. ठेका देण्यात आलेला धनेश्वर कन्स्ट्रक्शन हा ठेकेदार महापालिकेचा जावई आहे का, असा संतप्त सवाल आंदोलकांनी महापालिका प्रशासनाला विचारला आहे. नगरसेविका सुलभा उबाळे म्हणाल्या, ''सुरवातीला छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसवून त्याची जागा बदलल्यामुळे कोट्यवधीचा खर्च पाण्यात गेला. त्यावेळीची निविदा ५ कोटींची होती. नवीन व जुन्या ठिकाणी एकच ठेकेदार कसा, त्याला वाढीव दराने निविदा देण्याचा उद्देश काय आहे.'' ''निविदा रद्द न झाल्यास रस्त्यावर उतरुन आंदोलन करु असा इशारा'' नाना काटे यांनी दिला आहे. ''धनेश्वर कन्स्ट्रक्शन कंपनीला पुतळा उभारणीचा कोणताही अनुभव नसताना त्यांना कंत्राट देण्यात आले. प्रत्यक्षात पुतळा तयार करण्याचे काम शिल्पकार राम सुतार यांनी केले आहे. त्यांना बिल धनेश्वर कंपनीकडून देण्यात आले. नियमानुसार, पुतळ्याच्या कामासाठी स्वतंत्र निविदा काढणे आवश्यक होते. मुख्य कंत्राटदाराला कमिशन एजंट म्हणून वापरणे ही निविदाप्रक्रियेची फसवणूक आहे. यातून महापालिकेला आर्थिक तोटा झाला आहे. आर्थिक नुकसानीस जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे.'', अशी मागणी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी केली.




Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories