कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू, कंटेनर चालकाला अटक  

पिंपरी, ता. २ - सोमाटणे फाटा येथे पुण्याच्या दिशेला जात असताना कंटेनरची धडक बसून ५३ वर्षीय इसमाचा रविवारी (ता. १) मृत्यू झाला आहे. मूळचा उत्तरप्रदेश येथील असलेल्या कंटेनरचालकाला तळेगाव दाभाडे पोलिसांनी अटक केली आहे. बाबासाहेब रामभाऊ जाधव असे मृत इसमाचे नाव आहे.

याबाबत, मृत व्यक्तीचे नातेवाईक रोहित हनुमंत बजगुडे (वय २९ वर्ष) यांनी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत जाधव हे सोमाटणे फाटा जुना पुणे मुंबई हायवेवर मुंबईकडून दुचाकीवरुन पुण्याच्या दिशेने बाजार आणण्यासाठी जात होते. त्यावेळी,  आरोपी कंटेनगरचालक लाल शेखर यादव याने त्याच्या ताब्यातील टाटा कंटेनरने जाधव यांना धडक दिली. ते दुचाकीसह खाली पडले व कंटेनगर त्यांच्या पोटावरून गेल्याने गंभीर दुखापत होऊन त्यांचा पवना हॉस्पिटलमध्ये उपचारापूर्वीच मृत्यू झाला. 

पोलिसांनी आरोपी कंटेनरचालकाविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०६ (१) २८१ मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories

Please Accept Cookies for Better Performance