news
clock
मोशीमध्ये संकल्प मॅरेथॉनला मोठा प्रतिसाद, निरोगी जीवनशैलीसाठी संदेश

मोशीमध्ये संकल्प मॅरेथॉनला मोठा प्रतिसाद, निरोगी जीवनशैलीसाठी संदेश

मोशीमध्ये संकल्प मॅरेथॉनला मोठा प्रतिसाद, निरोगी जीवनशैलीसाठी संदेश

पिंपरी, ता. ३ - संकल्प लाड शाखीय वाणी समाज मंडळाच्या वतीने मोशी प्राधिकरण येथे 'एक पाऊल आरोग्यासाठी' या उपक्रमाअंतर्गत आयोजित संकल्प मॅरेथॉन मोठ्या उत्साहात पार पडले. सर्व वयोगटातील नागरीक मॅरेथॉनमध्ये उत्साहात सहभागी झाले.

मोशी प्राधिकरणातील छत्रपती श्री संभाजी महाराज पुतळ्याला मानवंदना देऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली. मॅरेथॉनपूर्वी सर्व स्पर्धकांकडून कवायती घेण्यात आल्या तसेच नियमित व्यायाम व आरोग्याचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. स्पर्धकांच्या हस्ते फुगे आकाशात सोडून मॅरेथॉनची औपचारिक सुरुवात करण्यात आली. 

स्पर्धेच्या मार्गावर विविध आरोग्यविषयक जनजागृतीपर फलक लावून निरोगी जीवनशैलीसाठी संदेश दिला गेला. संकल्प मंडळातर्फे प्रत्येक स्पर्धकाला मॅरेथॉन किट देण्यात आले. मॅरेथॉन पूर्ण झाल्यानंतर सर्वांसाठी पौष्टिक व सात्विक नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती. या उपक्रमामुळे समाजात आरोग्याविषयी जागरूकता निर्माण झाली.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Recent News

Top Categories