news
clock
महापौर पदासाठी रवी लांडगे व उपमहापौर पदासाठी शर्मिला बाबर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

महापौर पदासाठी रवी लांडगे व उपमहापौर पदासाठी शर्मिला बाबर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

महापौर पदासाठी रवी लांडगे व उपमहापौर पदासाठी शर्मिला बाबर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

पिंपरी, ता. २ - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौर पदासाठी भारतीय जनता पक्षाकडून रवी लांडगे व उपमहापौर पदासाठी शर्मिला बाबर यांनी सोमवारी (ता. २) उमेदवारी अर्ज दाखल केला. 

यावेळी आमदार महेश लांडगे आमदार शंकर जगताप, आमदार अमित गोरखे, आमदार उमा खापरे, गटनेते प्रशांत शितोळे यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते. महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळाल्यानंतर संपूर्ण शहराचे लक्ष महापौर पदाकडे लागले होते. महापौरपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने भाजपमधील अनेक नावे महापौरपदाच्या शर्यतीत होती. महापौर पदाचे नाव पक्षाची प्रदेश कोअर कमिटी ठरवेल असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले होते. सोमवारी महापालिकेमध्ये झालेल्या पक्षाच्या बैठकीमध्ये महापौर व उपमहापौर पदाच्या नावांची निश्चिती झाल्याची घोषणा करण्यात आली. 


प्रभाग क्रमांक ६ मधून बिनविरोध निवडून आलेले भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक रवी लांडगे व उपमहापौरपदासाठी आणि प्रभाग क्रमांक १५ मधून निवडून आलेल्या शर्मिला बाबर यांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. लांडगे व बाबर यांनी आपापले नामनिर्देशन पत्र आज दाखल केले आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Recent News

Top Categories