news
clock
चऱ्होलीत तीन पत्ती जुगारावर छापा, एकूण १३ लाख ६१ हजारांचा माल जप्त

चऱ्होलीत तीन पत्ती जुगारावर छापा, एकूण १३ लाख ६१ हजारांचा माल जप्त

चऱ्होलीत तीन पत्ती जुगारावर छापा, एकूण १३ लाख ६१ हजारांचा माल जप्त 

पिंपरी, ता. २ - पोलिसांनी छापा टाकून चऱ्होली बुद्रुक येथून तीन पत्ती जुगार खेळणाऱ्या १५ जणांकडून 

जुगाराच्या साहित्यासह व रोख रकम असे एकूण १३ लाख ६१ हजार ५५०/- रुपये किंमतीचा मुद्देमाल शनिवारी (ता. ३१) जप्त केला आहे. काही आरोपींना पोलिसांनी अटक करुन त्यांची जामीनावर सुटका करण्यात आली आहे आणि काहींना नोटीस बजावण्यात आली आहे. 

पोलिसांनी दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खालचा मळा, चोविसावाडी, चऱ्होली ब्रुद्रुक येथे असलेल्या पत्र्याच्या बंदीस्त शेडमध्ये १५ जण तीन पत्ती जुगार खेळत होते. 

त्यांच्याकडून जुगाराच्या साहित्यासह व रोख रक्कम असा एकूण १३ लाख ६१ हजार ५५०/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

१५ आरोपींमध्ये १) प्रशांत प‌द्माकर जुन्नरकर (वय ५० वर्षे), २) संतोष चंद्रकांत तापकीर (वय ५१ वर्षे), ३) सोमनाथ सुदाम हिवरेकर (वय-४५ वर्षे), ४) संजय धुमासींग बारेला (वय २८ वर्षे), ५) संतोष सुर्यकांत चराटे (वय ५० वर्षे), ६) संतोष अर्जुण गायकवाड (वय ६५ वर्षे), ७) तुकाराम पांडुरंग मुंगसे (वय ५९ वर्षे), ८) समीर आल्लाउद्दीन अन्सारी (वय ३१ वर्षे), प्रमोद रंगनाथ खोरपे (वय ५१ वर्षे), अब्दुल चाँद सय्यद (वय ६९ वर्षे), ११) अनिल गणपत तापकीर (वय ३१ वर्षे), १२) परमानंद रंगनाथ भागवत (वय २८ वर्षे), १३) सुनिल वसंत परदेशी (वय ६२ वर्षे), १४) गुन्हयाच्या घटनास्थळावरुन पळून जाणारे ७-८ अनोळखी इसम, १५) पत्र्याच्या बंदीस्त शेड येथे तिन पत्ती जुगार चालवणारा मालक बाळासाहेब तापकीर (रा. चऱ्होली बुद्रुक) यांचा समावेश आहे. 

आरोपी क्रं ६,१०,१३ यांना  नोटीस देण्यात आली आहे. आरोपी क्रं १,२,३,४,७,८,११, यांना अटक करुन योग्य व लायक जामीनदार दिल्याने जामीनावर मुक्त करण्यात आले आहे. आरोपी क्रे ५,९,१२ यांना दाखल गुन्हयात अटक करण्यात आली आहे. आरोपींवर महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम ४,५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

-----------------------------------------------------------------------------------------

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Recent News

Top Categories