news
clock
चारचाकी वाहने चोरणाऱ्या दोघांना अटक, ३ लाख ३० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त

चारचाकी वाहने चोरणाऱ्या दोघांना अटक, ३ लाख ३० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त

चारचाकी वाहने चोरणाऱ्या दोघांना अटक, ३ लाख ३० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त

पिंपरी, ता. ३ - काळेवाडी पोलिस ठाण्याच्या तपास पथकाने चारचाकी वाहने चोरुन त्यांचे तोडफोड करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांकडून ३ लाख ३० हजार रुपये किंमतीचा तीन चारचाकी वाहनांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या सूचनेनुसार काळेवाडी पोलिस ठाण्याकडून वाहनचोरी करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा तपास सुरु होता. त्यानुसार, काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांना गुन्हेगाराविषयी माहिती मिळाली.  आरोपी हा पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे वर निघाला असल्याची समजले. त्याप्रमाणे, तपासपथक त्या ठिकाणी रवाना झाले व आरोपीला ताब्यात घेण्यात आले. चौकशीमध्ये, आरोपीचे नाव शिवा मिड्डुलाल यादव (वय २० वर्षे, रा. चिखली) असल्याचे समजले. त्याने साथीदारासह टाटा सुमो गोल्ड ही चारचाकी २९ जानेवारीला चोरी केली व त्याच्या शिवा इंटरप्रायजेस या स्क्रॅप सेंटरमध्ये गाडीची मोडतोड करुन तिचे भाग वेगवेगळे केल्याची कबुली दिली. 

तपास पथकाने सदर स्क्रॅप दुकानात जाऊन पंचांसमक्ष झडती घेऊन तीन गाड्यांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींविरोधात  काळेवाडी पोलिस ठाणे, भोसरी पोलिस ठाणे व भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अधिक तपास सुरु असून आरोपींकडून अधिक गुन्हे निष्पन्न होण्याची शक्यता आहे, असे काळेवाडी पोलिसांनी सांगितले.

सदरची कारवाई पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस सह आयुक्त शशिकांत महावरकर,  अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) सारंग आवाड,  अपर पोलीस आयुक्त, (प्रादेशिक विभाग) बसवराज तेली, परिमंडळ - २ चे पोलिस उपायुक्त विशाल गायकवाड, सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली काळेवाडी पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र बहीरट, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुरेंद्र धुमाळे, तपास पथकातील अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव गुरव, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र काळे, पोलिस हवालदार स्वप्निल खेतले, प्रमोद कदम, अतिक शेख, अशोक जायभाये, भारत पारधी, विजय मोरे, मंगेश लोखंडे आणि पोलिस शिपाई अजय अरुण फल्ले, रमेश खेडकर, गणेश जाधव, रमेश ब्राम्हण, भारती यांनी केली आहे. 

--------------------------------------------------------------------------------------------

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Recent News

Top Categories